पिंपरी : मोरवाडी कार्टाजवळ जागेत असणाऱ्या स्क्रॅप मालाला आज दुपारी भीषण आग लागली माहिती मिळतात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी कोर्टाजवळ स्क्रॅप ग्राऊंडला आज दुपारी अचानक भीषण आग लागली आहे. काही क्षणातच धुराचे लोट परिसरात झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जुन्या इमारती मागील अमृतेश्वर सोसायटी जवळ प्रचंड मोठी आग लागली आहे. रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले आहेत. चोरीचे टायर, केबलचा बेकायदा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागली आहे. ऑईल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून अवकाळ धुराने काळवंडले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भितीची वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे बंब आले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.




