महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांच हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक दीडच्या सुमारास कारमध्ये जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक अशी पंढरी शेठ फडके यांची ओळख होती. पनवेलच्या विहिघरचे पंढरी शेठ फडके यांच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे 1986 सालापासून बैलगाडा शर्यतीत आवड त्यांना होती. बादल हा त्यांचा बैलही महाराष्ट्राचत तितकाच फेमस.
त्यांच्या दावणीत ४० -५० शर्यतीचे बैल असल्याचं बोललं जातं आणि या बैलांना महिन्याला लाखभर रुपयांची खाद लागते असं म्हणतात. बैलगाडा प्रेमी असण्यासोबत गोल्डमॅन म्हणूनही ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर त्यांचा डान्स चांगलाच चर्चेत असायचा.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. जिथे जिथे बैलगाडा शर्यत व्हायची तिथे पंढरी शेठ फडके यांचा गाडा धावणार नाही असं फार क्वचित व्हायचं. कुठल्याही शर्यतीत एक नंबर येणारा बैल हा पंढरी शेठ फडकेंना आपल्या दावणीत पाहिजे असायचा मग त्याची किंमत कितीही असली तरीही. बैलांना खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला असत.
पंढरीशेठ फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही राहिलेत. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, २०२२ मध्ये कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडके यांना अटक झाली होती या प्रकरणात त्यांना काही महिन्यांपुर्वी जामिनही मिळाला होता.



