इंदापूर : देश एका सक्षम नेतृत्वाखाली वाटचाल करत आहे. देशातील नरेंद्र मोदी सरकार हे केवळ विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. कोविड काळात सुरू केलेली “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना” मध्ये देशातील ८० कोटी गरीब जनतेला मोफत रेशन दिले जाते. PM किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये ग्रामीण भागातील वर्गासाठी अर्थसहाय्य योजना गोरगरिबांसाठी केंद्र सरकारकडून कार्यान्वित आहेत. सामान्य जनतेला “अन्न वस्त्र निवारा” मिळतो हीच मोदीची गॅरंटी आहे. बाजारात विकण्यासाठी असणाऱ्या वस्तूला गॅरंटीसाठी तारीख असते मात्र विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनता हीच गॅरंटी असते. असा आशावाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार काय म्हणाले की, इंदापूरच नाही तर पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून सगळे काम करतो. त्यात सगळी काम होणार याची खात्री करुन घेतो. कामे कशी करायची मला माहित आहे, कारण अंडी पिल्लं आपल्याला माहीत आहे. 40 कोटींचा पुणे जिल्ह्याच्या विकास आराखडा आज 1250 कोटींवर गेला. महाराष्ट्रमध्ये गेलो तर काय चांगलं आहे ते आपल्या भागात आणायचं कसं याचा विचार करतो, मी कामाचा माणूस आहे.



