पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ हे अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले. तसेच शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरचंद्र पवार आणि तुतारी निवडणूक चिन्ह देण्यात आले. मात्र पिंपरी चिंचवड मधील शरद पवार गटातील माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत यांना अजूनही आपल्या सोशल मीडिया पोस्टवरील घड्याळ चिन्ह काढण्याचा मोह सुटताना दिसत नाही.
https://www.facebook.com/share/p/5biv8a7vvLQVEz4D/?mibextid=oFDknk
शहरातील अनेक राजकीय व्यक्ती परिसरातील व प्रभागातील अनेक छोट्या मोठ्या नागरिकांच्या वाढदिवसाची, लग्नाच्या वाढदिवसाच्या अथवा अभिनंदनाच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल करत असतात. अशीच एक पोष्ट शरद पवार गटातील सुलक्षणा शीलवंत यांनी टाकली आहे. एका काका काकू यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिलवंत यांनी आपल्या नावाअगोदर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे अधिकृत चिन्ह टाकलेले आहे. त्यामुळे त्या नेमक्या कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, याबद्दल उलट सलट चर्चा सुरू झाली आहे.
शीलवंत या संत तुकाराम नगर प्रभागातून 2017 च्या महापालिका निवडणुकीत विजय झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये वडिलांच्या आशीर्वादामुळे विधानसभेची उमेदवारी ही मिळाली आणि राजकीय घडामोडीमुळे रद्द ही झाली होती. मात्र, त्यानंतर प्रभागातील नगरसेवक व पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांचे मतभेद तयार व्हायला लागली. त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी ही विरोधी प्रतिस्पर्धी यांनी न्यायालयीन लढाया लढल्या. अनेक वादग्रस्त व खडतर राजकीय प्रवास करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटात सामील होत आपले नवीन राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. नुकत्याच निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तूतारी हे चिन्ह बहाल केले आहे. चिन्ह बदल नंतर अनेक राजकीय लोकांनी आपल्या पोस्टवर जुने चिन्ह बदलून नवीन चिन्ह वापरले. परंतु शीलवंत यांनी आज केलेल्या पोस्ट वरती जुनेच घड्याळाचे चिन्ह वापरल्याने त्यांना अजून घड्याळाचा मोह सुटला नाही का? अशी चर्चा आहे.




