पिंपरी : लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या हालचालींना आला आहे. यामध्ये भाजपने 32 पेक्षा अधिक जागा लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५ लोकसभा मतदारसंघावर भाजपने लढण्याचा दावा केला आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी एकनाथ शिंदे यांच्या गटालाच मिळणार असल्यामुळे मावळ लोकसभेत शिवसेनेचे धनुष्यबान विरुद्ध मशाल यांच्यामध्येच सरळ लढत होणार हे नक्की….
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. माहितीमध्ये लोकसभा जागावाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू आहेत. महायुतीच्या जागावाटपचा फॉर्म्युला ठरणार आहे. यामध्ये भाजप 32 जागा शिंदे गट दहा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासाठी चार जागा देण्याच्या हालचाली जवळपास निश्चित आहेत.
आगामी लोकसभेसाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यामध्ये हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर आणि यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, हातकणंगले, रामटेक, बुलढाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळ हे मतदारसंघ कायम राहतील. तर अजित पवार गटासाठी बारामती रायगड शिरूर या तीन जागा कोणत्याही स्थितीत कायम राहणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने दोनच दिवसापूर्वी माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी घोषित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मावळ लोकसभा राहणार असल्यामुळे त्यांच्याकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे व संजोग वाघेरे यांच्यातच थेट लढत होईल असे चित्र आहे.




