सांगली : महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज मातोश्री वरती शिवसेना (उबाठा) पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांसह मोठ्या उत्साहात प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांनी तयारी केली असून त्यांच्या शिवसेना प्रवेशाने महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारीची आशा धुसुर झाली आहे.
गेले काही दिवसापासून सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असताना काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगलीत कोणत्याही स्थितीत काँग्रेसच निवडणूक लढविणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार म्हणून सामोरे जाऊन खासदार होतील असा विश्वास शनिवारीच व्यक्त केला होता. आता अल्पावधीत लोकप्रिय झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या शिवसेनाप्रक्षेमळे सांगलीतील वातावरण ढवळून निघाले आहे.



