पुणे : भारतीय जनता पक्षाने बुधवारी (13 मार्च) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकीटे कापण्यात आली. मात्र पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने उमेदवारी घोषित करून पुण्यातील चर्चांना भाजपने पूर्णविराम दिला आहे.
BJP releases its second list of candidates for the upcoming Lok Sabha elections pic.twitter.com/bpTvxfMkDr
— ANI (@ANI) March 13, 2024
भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20, कर्नाटकमधील 26, मध्य प्रदेशातील 5, गुजरातमधील 7, तेलंगणा आणि हरियाणातील प्रत्येकी 6, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 2, दादरा-नगर हवेली आणि त्रिपुरातील प्रत्येकी 1 जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेजवारांची नावे आहेत.

भाजपने तेलंगणातील 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात आदिलाबादमधून गोदाम नागेश, पेड्डापल्लेमधून गोमासा श्रीनिवास, मेडकमधून माधवनेनी रघुनंदन राव, महबूबनगरमधील डीके अरुणा, नलगौडामधून सईदा रेड्डी आणि महबुबाबादमधून अजमीरा नाइक यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपने तेलंगणातील इतर 9 उमेदवारांची घोषणा आपल्या पहिल्या यादीत केली आहे.
भाजपने आपल्या पहिल्या यादीत 194 उमेदवार जाहीर केले होते, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. पक्षाच्या पहिल्या यादीत 28 महिला आणि 47 तरुणांचा समावेश आहे, तर 27 उमेदवार अनुसूचित जाती, 18 अनुसूचित जमाती आणि 57 इतर मागासवर्गीय आहेत.
या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील 15-15 जागा, केरळ आणि तेलंगणातील 12-12 जागा, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममधील 11-11 जागा आणि दिल्लीतील पाच जागांचा समावेश होता. आता आज अखेर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली.
महाराष्ट्रातले भाजप उमेदवार
नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील



