लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा उद्या दुपारी होणार आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांना त्यांच्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज जानकरांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात.
अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार असल्याचे चर्चा सुरु आहेत. हे सुरु असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय झाले? त्याची माहिती त्यांनी दिली. महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपसोबत राहिले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना माढ्याची लोकसभेची जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात याबाबत चर्चा झाली असून लवकरच निर्णय होणार असल्याचेही बोलले जात आहे.



