पिंपरी : घराच्या छतावर रोपटॉप सोलर सिस्टिम बसवून 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयापर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे. यासाठी सर्वे करण्याचे काम शहरात 300 पोस्टमन द्वारे करत असून आत्तापर्यंत 3000 घराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना टपाल वाटपासोबतच घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे लागत आहे. रूफ टॉपवरती केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलो वॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान थेट मिळते. कितीही क्षमतेचे रोपटॉप सोलर सिस्टिम बसवली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रति ग्राहक ७८ हजार रुपये इतकेच निश्चित केलेले आहे. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रुपटॉप सोलर सिस्टिम बसवण्यासाठी महावितरण मदत करते.
येथे नोंदणी करा
ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल यासाठी उपलब्ध आहे.
दरमहा 120 युनिट तयार होते..…
अर्धा किलोवॅट क्षमतेच्या रूपटॉप सोलर सिस्टीम मधून दररोज सुमारे ४ युनिट अर्थात दरमहा सुमारे 120 मिनिट तयार होते. महिना १५० युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅट क्षमतेचा रूपटॉप सोलर सिस्टीम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलो वॅट क्षमतेची सिस्टीम पुरेशी ठरते.




