पिंपरी : समाजात ज्याप्रमाणे डॉक्टरांचे नावापुढे डॉ. किंवा वकिलांच्या नावापुढे ॲड अशी उपाधी लावली जाते त्याप्रमाणे राज्यातील शिक्षकांच्या नावापुढ Tr – टी. असे संबोधन लावण्यात येणार आहे. याबाबतचे अध्यादेश राज्य सरकारने जाहीर केले आहेत.
राज्यातील सर्व शाळेतील शिक्षकांना एकच ड्रेस कोडसाठी राज्य सरकारने नवीन सूचना जाहीर केले आहे. यामध्ये महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता दुपट्टा असा तर पुरुष शिक्षकांना साधा शर्ट आणि पॅन्ट, शर्ट इन असा पेहराव करावा. शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये अशा सूचना राज्य सरकारने सर्व शिक्षकांसाठी एक ड्रेस करून ठरवावा असा अध्यादेश जाहीर केला आहे.
समाजात गुरु व मार्गदर्शक म्हणून सर्व शिक्षकांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांचा ड्रेस कोड नियंत्रण आणण्याबरोबर राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीत Tr तर मराठी भाषेत टी असे संबोधन लावण्याची सूचनाही राज्य सरकारने अध्यादेशातून दिले आहेत तसेच या संदर्भातील शिक्षण आयुक्त मार्फत बोधचिन्ह निश्चित करण्यात येणार आहे हे संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येणार आहे.



