पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता करणार आहे. लोकसभे सोबत ओडिसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यातही निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. या काळात कोणतीही शासकीय कामे करता येणार नाही. तसेच आचारसंहिता दरम्यान सरकार कोणत्याही बदल्या अथवा नियुक्त्या करू शकत नाही. त्यासाठी सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
देशात स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात निवडणुका संपन्न व्हावा यासाठी नियम बनवले आहेत त्यालाच आचारसहित असे म्हटले जाते लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नियमांचे पालन करणे सरकार राजकीय पक्ष आणि पक्षांचे नेते यांना मतदानकारक असते. केंद्रात रज्यातील 17 पक्ष व प्रत्येक उमेदवाराने या आचारसंहितेचे पालन करावे यासाठी निवडणूक आयोग घटनेच्या कलम 324 अन्वये बंधनकारक आहे.
या दरम्यान राजकीय पक्षांना मिरवणूक सभा काढावयाची असेल तर त्यापूर्वी परवानगी घेणे अनिवार्य असते संबंधित उमेदवाराला जवळच्या पोलीस ठाण्याला त्याची माहिती द्यावी लागते पक्षाची अथवा उमेदवारांची जाहीर सभा होणार असेल तर त्याबाबत ही कळवावे लागेल राजकीय पक्ष कोणताही असो वा अकाउंट नेता कोणताही असो त्यांना आचारसंहिताचे उल्लंघन करता येत नाही निवडणुकीच्या काळात गुन्हे दुराचार भ्रष्ट व्यवहार लाचखोरी मतदान अविश दाखवणे मतदारांना धमकवणे अथवा भवित करण्याचा प्रसार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी कार्यवाही ही करू शकते संबंधित व्यक्तीच्या विरोधात एफ आय आर दाखल केला जातो व दोष सिद्ध झाला तर त्याला तुरुंगात ही जावे लागते.
या गोष्टी करता येत नाहीत
• आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार नव्या योजनेची घोषणा, भूमिपूजन अथवा लोकार्पण करू शकत नाही.
• प्रचारासाठी सरकारी सामग्रीचा वापर करता येत नाही. सरकारी गाडी, बंगला, विमानाच्या वापरास मनाई,
धार्मिक स्थळे अथवा प्रतिकांचा वापर करण्यास मनाई.
भींतींवर लिहिलेल्या घोषणा, पोस्टर्स हटवली जातात.
मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी वाहनांचा वापर करता येत नाही.
मतदानाच्या दिवशी आणि २४ तास अगोदर मद्य वितरणास मनाई.
निवडणुकीशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्या मंत्र्याची अथवा नेत्याची त्याच्या घरी अथवा प्रवासात भेट घेण्यास मनाई.
पक्ष आणि उमेदवारावर व्यक्तिगत पातळीवरची टीका करता येणार नाही.
धर्म आणि जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत.



