मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
BIG BREAKING – Bombay HC sets aside acquittal of ex-cop & encounter specialist PRADEEP SHARMA &
sentences him to LIFE IMPRISONMENT in Lakhan Bhaiya fake encounter case of 2006.HC also UPHOLDS life to 12 cops and 1 civilian in 1st conviction of cops in fake encounter. pic.twitter.com/Zli47p82gi
— Live Law (@LiveLawIndia) March 19, 2024
न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणात एकूण १६ याचिका आल्या होत्या. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल देण्यात आला. या निकालात २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं होतं.



