अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. ते सध्या या जागेवरून खासदार आहेत. नवनीत राणा कमळावर लढणार हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपने उमेदवारी दिल्यावर नवनीत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच. अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या 12 ते 13 वर्षापासून काम करत होती. मी कोणत्या पक्षाकडून लढावे हे मी अमरावतीकरांच्या डोळ्यात नेहमी पाहिले आहे. देशाचे प्रधामंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना मी माझे नेता मानते. नेत्यांनी ठरवलं तर त्यांच्या पुढे मी जाणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विजयी होऊन नवनीत राणा संसदेत पोहोचल्या होत्या. महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांनी 36,951 मतांनी विजय मिळवला होता.



