मुळशी, ६ एप्रिलः बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगत आली आहे. पवार कुटुंबात राजकीय विभाजन झाल्यापासून कोणता झेंडा घेवू हाती अशा अवस्थेत असलेल्या पूर्व पट्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई मधील दिग्गज मंडळीनी शेवटी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय वाटचाल सुरु ठेवण्याचा निर्णय घेत आज सर्वांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेत, तुतारीला बाय बाय करत घड्याळाचे काटे फिरविले.
मुळशी तालुक्यात विशेषतः पूर्व पट्यात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात होते. दादा कि ताई हे कोडे त्यांना सुटत नव्हते. एकाकीकडे गेली दहा ते पंधरा वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत काम केले आणि दुसरीकडे याच कालावधीत घराघरात राष्ट्रवादीचे विचार आणि घड्याळाचा प्रचार केला. त्यामुळे आता नेमकं तुतारी वाजवायची कि घड्याळ चालवायचे हा प्रश्न अनेकांना सतावत होता, अखेर आमदार सुनील शेळके आणि सुनील चांदेरे यांच्या प्रयत्नाला यश आले. आज पुणे येथे सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून सविस्तरपणे चर्चा केली. त्यामुळे केवळ बारामती लोकसभेचा विचार न करता भविष्यातील दीर्घकाळ विकासाचा विचार करून सर्वांनी दादांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पूर्व पट्यात अजित दादांची ताकत चांगलीच वाढली आहे.
यामध्ये जेष्ठ नेते नंदुशेठ भोईर, भोर विधानसभा अध्यक्ष सुरेश हुलावळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष व मा. सरपंच सागर साखरे मा. सरपंच दत्ताभाऊ साखरे, मा. सरपंच गणेश गायकवाड, मा. सरपंच संतोष मोहिते, मा. सरपंच बाळासाहेब भिंताडे, मा. सरपंच शिवाजी किसन जाधव, मा. उपसरपंच योगेश शिंदे, मा. उपसरपंच गणपत जगताप, मा. उपसरपंच शरद शिंदे, मा. उपसरपंच संजय जाधव, मा. उपसरपंच सुदामराव दर्शिले, मा. उपसरपंच कौस्तुभ शिखरे, मा. उपसरपंच तानाजी पारखी, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष राजू गायकवाड, मा. उपसरपंच राजेंद्र गायकवाड, मा. उपसरपंच शिवाजी मारुती जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पांडुरंग राक्षे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाबा राक्षे, ग्रामपंचायत सदस्य मयूर साखरे, कपिल बुचडे, सचिन आढाव, नाना कोळी, सुधीर हिंगडे, युवराज किर्वे, संजय जरे, स्वामी जगताप, सुखलाल बुचडे, अशोक जगताप, अनिल जाधव, दिनेश साखरे आदि हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई मधील दिग्गज मंडळीनी अजित पवार यांची भेट घेवून सुनेत्रा पवार यांना खासदार करण्याचा संकल्प केला.




