जळगाव : मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय नव्हे, तर मी बांधलेलं ते घर आहे. मी माझ्या घरात परत जातोय,जाण्याचा दिवस आपण जाहिरपणे कळविणार आहोत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसीबाबत मत व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याबाबत संकेतही मिळत होते. मात्र शनिवारी एकनाथ खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई येथे त्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र ते घरवापसी केंव्हा करणार याबाबत मात्र त्यांनी तारीख जाहीर केलेली नाही.



