पिंपरी (प्रतिनिधी) मावळ लोकसभा अंतर्गत असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील तदान केंद्रावरील कर्मचार्यांना पीपीटी सादरीकरणाच्या माध्यामतून निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले. मावळ लोकसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी हे प्रशिक्षण दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यामध्ये इव्हीएम हॅण्डस् ऑन ट्रेनिंग एकूण ३० क्षेत्रीय अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यकांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या हा प्रशिक्षणात १३५७ पैकी ११७४ कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल कदम, अमित पंडित, किरणकुमार मोरे, नोडल अधिकारी संदीप खोत व सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. नोडल अधिकारी शिरिष पोरेड्डी यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन केले.




