पिंपरी : प्रदूषण, धक्का धक्कीचे जीवन आणि कोविड सारखी महामारी यामुळे नागरिकांना स्वतःच्या आरोग्याचे महत्त्व समजून दिले. आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आज फॉर्च्यून हॉस्पिटलची सेवा नागरिकांना मिळणार आहे. हे अतिशय सुंदर अत्याधुनिक यंत्रसामुग्री असणारे हॉस्पिटल पिंपरी चिंचवडगारांना मिळणार आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी काढले. ते वाकड येथील फॉर्च्यून हॉस्पिटल उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी चिंचवड आमदार अश्विनीताई जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, बाळासाहेब नेवाळे, जयहिंद अर्बन बँकेचे अध्यक्ष धनाजी विनोदे, मा. नगरसेवक संतोष बारणे, अश्विनी चिंचवडे, सचिन चिंचवडे, जगदीश शेट्टी, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, श्रीधर वाल्हेकर, चेतन भुजबळ, विश्वजीत बारणे, उद्योजक राजू भिसे आदी मान्यवर उपस्थित आहेत. तसेच वाकड येथे फॉर्च्यून हॉस्पिटल उभारणीत राजेंद्र सोपान पवार, डॉ. प्रियांका विनोदे, डॉ. कपिल जाधव, सौ. स्वाती राजेंद्र पवार यांचा मोठा वाटा आहे.
यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, कोरोना महामारीत प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्याच्या करता आपण सगळ्यांनी जे परिश्रम केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हॉस्पिटल उभं केले. अनेक महत्त्वाच्या वायसीएम असतील किंवा बाकीचे सगळे हॉस्पिटलमध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न केला. कोविड सारख्या रोगाची लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. या रोगाला आपण परतून लावण्याचे काम केलं, पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने आरोग्य आणि आरोग्याचे रक्षण करणे किती महत्त्वाचं आहे हेही समजले. यात सगळ्याची किंमत आपण सगळ्यांनी मोजलेली आहे. अनेक जीवाभावाची माणसं तुम्हाला सोडून गेलेले आहेत. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावली आहे. याच क्षेत्रात नवीन होणारे फॉर्च्यून हॉस्पिटल नागरिकांना चांगली सेवा देईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.



