![]()
पुणे : आई मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मुलाच्या अशा हट्टापाई कर्ज घेऊन आई-वडिलांनी मुलाला शिकवून उच्चशिक्षण दिलं. उच्चशिक्षण देत असताना महाविद्यालयातच आलेली प्लेसमेंट घेऊन मुलगा सहा महिन्यांपूर्वी परदेशात गेला. मात्र तीन दिवसांपूर्वी आई वडिलांना तुमचा मुलगा बेपत्ता झाला आहे, असा फोन आल्याचा दावा मुलाच्या आई वडिलांनी केला आहे. प्रणव कराड असं बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्या मुलाचं नाव आहे. प्रणव बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांकडून कंपनीशी संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु, कंपनीनं कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असा आरोप प्रणवच्या आई वडिलांनी केला.
यावेळी “मुलाशी कोणताही संवाद होत नसल्यानं माझं मुलगा हवा,” अशी आर्त हाक आई-वडील देत आहेत. पुण्यातील शिवणे येथे राहणारा 22 वर्षीय प्रणव कराड हा परदेशातून बेपत्ता झालाय. “कंपनीकडून प्रणवचं शोध कार्य देखील थांबवण्यात आलंय. सरकारनं आता या प्रकरणी लक्ष घालावं,” अशी मागणी, आत्ता प्रणवच्या आई वडिलांकडून केली जातं आहे. तर याबाबत वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे म्हणाले की, “आमच्याकडं त्यांचं अर्ज आलेला आहे. आम्ही याबाबत योग्य तपास करण्यात येणार आहे.
प्रणव हा पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये नॉटिकल सायन्स नावाचा कोर्स करत होता. हा कोर्स झाल्यावर त्याला कॉलेजमध्येच प्लेसमेंट आलं आणि त्याचं सिलेक्शन ‘विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड’ या कंपनीत झालं. तो अमेरिकेत शिफ्ट डेस्कला काम करू लागला. सहा महिन्यापासून तो या कंपनीमध्ये काम करत होता आणि शिपमधून विविध देशात जात होता. दहा दिवसांपूर्वी तो ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर असा प्रवास करत असताना प्रणव हा बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीकडून आई वडिलांनी देण्यात आली.




