नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हटलं आहे. निवडणुकीतनंतर हे दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकाच्या भाषणात केला आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“काँग्रेसची अवस्था अशी आहे की त्यांना विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यांनी असा दावा केला आहे की निवडणूक संपल्यावर काँग्रेस पक्षात लहान पक्ष विलीन होतील. तसा सल्लाच या बड्या नेत्याने दिला आहे. कारण त्यांना वाटतं की सगळी दुकानं सुरु आहेत ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो. ही यांची अवस्था आहे.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.



