अहमदनगर– राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्तीचा वावर सुरु असल्याचा त्यांनी दावा केलाय. कुंपणच आता शेत खातय असं म्हणत त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.
निलेश लंके यांनी यांसदर्भात व्हिडिओ ट्वीट करत म्हटलंय की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय.काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. निलेश लंके यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांनी यापूर्वीची काही आरोप केलेले आहेत.
मतदारसंघात पैसे वाटत होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. शिवाय, मतदानादिवशी बाहेरच लोकांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भात एका व्यक्तीला पकडलं देखील होतं. निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.
संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय.
काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला.… pic.twitter.com/I0tZqYJpEI
— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) May 22, 2024



