पिंपरी :- तळवडे येथील देहू आळंदी बीआरटीएस रोडवरील कॅनबे चौक मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात महापालिकेने पाणीपुरवठा कामासाठी ‘पाईप्स’ ठेवण्यात आलेले आहेत. या चौकातून चाकण एमआयडीसीसह आयटी कंपन्या व औद्योगिक कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
देहू व चाकण औद्योगिक वसाहतीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातच ठेवलेल्या पाईपांच्या ढीगामुळे पादचाऱ्यांचे तर हाल होतच आहे त्याचबरोबर याचा सामना थेट वाहतूक कोंडीला निमंत्रण देणारा ठरत आहे.
पालिका प्रशासनाला पाईप हटवण्यासाठी वारंवार तक्रार देऊनही या संबंधित कोणत्याह कारवाई पालिका प्रशासनाकडून होत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर असणारे पाईप्स हटविण्याची मागणी श्रीनिवास बिरादार यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांसह पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.




