
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा डे साजरा केला. श्रीनगरमध्ये योगा डे साजरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांसोबत सेल्फीही घेतला. संपूर्ण जग आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदी सध्या श्रीनगरमध्ये आहेत. योग दिनानिमित्त त्यांनी देश आणि जगाला संबोधित केले. यानंतर ते श्रीनगरमध्ये सामूहिक योगा केला. केंद्रीय मंत्रीही आज देशाच्या विविध भागात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहेत.
योग दिवस नवीन विक्रम निर्माण करतंय
दरम्यान, . योग दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,”मला काश्मीरमध्ये येण्याचे भाग्य लाभले आहे. योगातून जी शक्ती मिळते, ती मी श्रीनगरमध्ये अनुभवत आहे. मी काश्मीरच्या भूमीतून योग दिनानिमित्त देशातील सर्व लोकांना आणि जगाच्य कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे.” असे म्हटले. तसेच “मी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या त्या प्रस्तावाला 177 देशांनी पाठिंबा दिला, हा एक विक्रमच होता. तेव्हापासून योग दिन सातत्याने नवनवीन विक्रम निर्माण करत आहे. 2015 मध्ये दिल्लीत ड्युटीच्या मार्गावर 35 हजार लोकांनी एकत्र योगासने केली होती.
