![]()
देहू : संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, तुकोबारायांचे दहावे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे आज देहावसान झाले. त्यांचे वय ७६ वर्ष होते.
संभाजी महाराज हे मावळ तालुक्यातील देहूगांव येथील रहिवाशी आहेत. संभाजी महाराज हे तुकाराम महाराज्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्यांनी अनेक वर्ष विना पादत्राणे वारी केली आहे.
संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह.भ.प प्रशांत महाराज मोरे यांचे ते वडील होत. आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचने केली आहेत. संभाजी महाराज यांनी कीर्तनाची परंपरा चालवली आता त्यांचे चिरंजीव प्रशांत महाराज देहूकर ही पुढे नेत आहेत.




