
मुंबई : राज्यातले आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. सरकारने दूधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलाय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होऊ नये याची काळजी हे सरकार घेत आहे. राज्यात देखील शेतकरी विरोधी लोक सत्तेत बसले आहेत. या निर्णयामुळे अमूलला कसा फायदा मिळेल याकडेच त्यांचे लक्ष आहे. दूधाचा दर महाराष्ट्रातच सर्वात कमी आहे. मात्र याच कंपन्या शेतकर्यांकडून कमी दरात दूध विकत घेतात आणि 45-50 रुपये प्रति लिटरनं ते दूध विक्री करून अधिक नफा मिळवता. त्यामुळे सरकारचे अद्याप शेतकरी विरोधी धोरण कायम असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.
राज्यात दूधाचा दर सर्वात कमी आहे. असे असताना केवळ अमूलच्या फायद्यासाठी सरकारकडून दूध भुकटीची आयात केली जात आहे. याचा आम्हाला विरोध असून दूधाचे दर कमी जास्त करणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. आज अमूल सारख्या कंपन्या शेतकर्यांचे नुकसान करत आहे, त्यावर कोणीही बोलत नाही. राज्यातले हे सरकार गुजरात धार्जिणे आहे. शेतकऱ्यांना प्रति लीटर 40 रुपये दर मिळावा, ही आमची मागणी ही नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारकडे केली आहे.



