
सांगली : शिक्षणाचा दर्जा व आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तत्कालिन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात राबवलेला जयंत पॅटर्न राज्यभर राबवण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आधी गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य कर्मचारी भरती अशा विविध गोष्टी केल्या गेल्या.
या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला. तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे तर तसेच ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे.



