
दारू पिऊन वाहन चालविल्यास थेट लायसेन्स रद्द करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयाला प्रस्ताव पाठवला आहे. पोलिसांचा हा प्रस्ताव न्यायालयात मान्य होतो का? हे पाहावं लागेल. पुण्यात भीषण अपघात झाले ते दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे घडले आहेत.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात आणि मागील दोन दिवसात पुणे-मुंबई महामार्गावर एकाने मद्यधुंद अवस्थेत गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना उडवले होते. या सर्व घटनांमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना मद्यधुंद चालकाने उडवले होते. अपघात झाल्यानंतर आरोपी घरी जाऊन निवांत झोपला होता. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवण्याविरुद्ध पोलीस कठोर कारवाईच्या भूमिकेत आहेत. दारू पिऊन गाडी चालवल्यास पहिल्यांदा १० हजार रुपये दंड भरावा लागतो. दुसऱ्या वेळेस असा गुन्हा घडल्यास २० हजार रुपये दंड आहे. काही प्रकरणामध्ये तुरुंगवास देखील होऊ शकतो.




