मुंबई : सध्या महायुती सरकारमध्ये सत्तेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळाले. तसेच त्यांच्या सोबत असणारा एकही आमदाराला शरद पवारांना आपल्याकडे खेचून महाविकास आघाडीला मतदान करता आले नाही.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवार यांनी वंचित, MIM सोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात भुजबळांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं तर आम्हाला तिस-या आघाडीची गरज नसल्याचं धर्मरावबाबा अत्रामांनी म्हटलंय. तर तिस-या आघाडीबाबत अद्यापपर्यंत आम्हाला प्रस्ताव आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास आपण सकारात्मक आहोत असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भेटीत विधानपरिषद निवडणुकीबाबत झाली चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला होता. राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) मत कमी असताना देखील त्यांच्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाल्याने मिळालेल्या वाढीव मतांवर बैठकीत चर्चा झाली. महायुतीतील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर काय परिस्थिती असेल यावर देखील झाली चर्चा. जर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वतंत्र निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीला जास्त मत मिळू शकतील अस काही नेत्यांच म्हणण आहे. तसेच या तिसऱ्या आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील एक मोठा पक्ष ही सहभागी होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



