पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मुंबई येथील कार्यालयात आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, त्यांचे समर्थक कार्याध्यक्ष राहुल भोसले व भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच विद्यार्थी सेलची शहराध्यक्ष यश साने यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याला साने यांच्याकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. आहे.
पिंपरी गावातील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात २० जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा होणार आहे. त्यापूर्वी आषाढी एकादशी निमित्त अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह ४० माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळाले. एकूण १० पैकी ८ जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. तसेच, महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत घवघवीत यश मिळाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित गव्हाणे यांनी ‘तुतारी’ हातात घेतली आहे, असा




