वडगाव मावळ : पिंपरी चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू होते. या योजनेला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध होता. तो विरोध आजही कायम आहे. दरम्यान, याविरोधात शेतकऱ्यांनी 9 ऑगस्ट 2011 रोजी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मोर्चा काढला. या मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले.
तळेगाव दाभाडे शहरात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. तळेगाव येथे झालेल्या आंदोलन प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सर्वांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. वडगाव मावळ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे एल गांधी यांनी निर्दोष मूक्तीचे आदेश दिले आहेत.
दोषमुक्त झालेले कार्यकर्ते
निलेश मधुकर येवले, गणेश किसन भेगडे, प्रकाश हजारीमल ओसवाल, सुर्यकांत बाबुराव गरुड, सागर गुलाबराव टकले, राकेश सतीश भोर, धनंजय चंद्रकांत सोरटे (देशमुख), सुनील अर्जुन मोरे, अनिल भागाजी भांगरे, प्रशांत महादेव शिळीमकर, सुनील भगवान कांबळे, सतीश मारुती गरुड, संदीप बाळासाहेब भेगडे, विशाल बसवराज गायकवाड, अरुण जगन्नाथ भेगडे, लक्ष्मण गोपीनाथ माने, अजय तुकाराम भेगडे, रजनी भोलासिंग उर्फ विश्वनाथ ठाकूर या २० मावळ वासियांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.




