जालना : जालन्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. तुपेवाडी फाट्याजवळ एक चारचाकी विहिरीत कोसळली. चारचाकी विहिरीत कोसळल्यानं सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेली चारचाकी काळी पिवळी जीप बाहेर काढण्यात आली असून गाडीत 12 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हे प्रवासी पंढरपुरहून राजूर गणपतीच्या दिशेनं जात होते. मोटारसायकल आणि काळी पिवळीचा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळं रोडच्या कडेला शेतात असलेल्या विहीरीत ही काळी पिवळी जाऊन पडली. दुचाकीला वाचवण्याच्या नादात जीप विहिरीत पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


