सांगवी येथे भरदिवसा घरफोडी घडली असून या गुन्ह्यातील आरोपी हे निष्पन्न झाले आहेत. त्यातील एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.4) दुपारी शितोळे नगर, सांगवी येथे घडली आहे.
हुकूमसिंग रामसिंग कल्याणी (वय 32 रा. सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीचे साथीदार जयपाल पालुसिंग (वय 20, पिंपरी) व एक अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात चंद्रशेखर नारायण खोले (वय 67 रा.सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना आरोपींनी कटर व गज यांच्या साहाय्याने कडीकोयांडा तोडला व घरातील 70 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली आहे.



