
बारामती : महापर्व बक्षिस जिंकण्याचे..मंगलमय पैठणी साड्यांचे, या उपक्रमांतर्गत माळेगावात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह हजारो महिलांच्या उपस्थितित अनेक महिला स्पर्धकांनी कला-गुणांचे लक्षवेधी प्रदर्शन केले.
माझी वसंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागपंचमी सणाचे औचित्य साधत माजी सरपंच दीपक तावरे, राधा आकाश तावरे यांनी महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. विशेषत: मंत्रीमहोदय अदिती तटकरे यांच्या हस्ते वरील यशस्वी महिलांचा सन्मान झाला. यावेळी स्पर्धकांबरोबर उपस्थित महिलाचा उत्साह पाहून तटकरेही कमालिच्या भारावल्याचे दिसले.
माळेगाव (ता.बारामती) येथे नागपंचमी सणाचे औचित्य साधून दीपक तावरे, राधा आकाश तावरे व नागेश्वर प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महिला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी `खेळ पैठणीचा` हा स्पर्धात्मक कार्य़क्रम १ हजार पेक्षा अधिक महिलांच्या उपस्थित शुक्रवार (ता.९) रोजी पार पडला.यावेळी नव्याने पीएसआय पदाला गवसणी घातलेल्या मोनिका येळे, उत्कर्षा गावडे, एसआरपी शौनक दुरूगुडे यांचीही उपस्थिती अक्षरशः लक्षवेधी ठरला.
या वेळी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, अभिनेते रामभाऊ जगताप, प्रा.लक्ष्मण भोसले, सौ. प्रतिभा तावरे, सौ.स्नेहलता ठोंबरे, अॅड.गायत्री राहुल तावरे, सौ.ज्योती लडकत आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री तटकरे यांच्या हस्ते मानाची पैठणी जिंकलेल्या रामेश्वरी विकास कानतोडे यांचा सन्मान झाला.



