पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची तब्बल 16 तास ईडीनं कसून चौकशी केली. ही चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. काल दिवसभर मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील तसंच शिरूर येथील निवासस्थानांवर ईडी कडून छापेमारी करण्यात आली होती. यात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं होतं.
5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त – पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी काल ईडी कडून अचानक छापा टाकण्यात आला. मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी ईडीनं कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत त्यांच्या घरात 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच आलिशान कार, एक कोटींची चार घड्याळंही जप्त करण्यात आली आहेत.




