सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीचे नेते विविध विषयांवर महायुती सरकारवर भाष्य करताना दिसत आहेत. याठिकाणी महायुतीतील कलहाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण रणशिंग फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. हाती तुतारी घेतल्यानंतर समरजितसिंह घाटगे यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी घेण्याचे संकेत देताना दिसत आहेत.
फलटणमध्ये महायुती मधील दोन निंबाळकर एकमेकांच्या समोर टाकले आहेत भाजपचे माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वाक्य युद्ध सुरू आहे. फलटण मध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही निंबाळकर यांच्यामधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेली आहे.
नाहीतर तुतारी वाजवायला किती वेळ लागेल
शेवटी काय करावे आणि काय करू नये हे आपल्या हातात आहे. कार्यकर्त्यांना सांभाळणे हे भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाचे काम आहे. प्रशासन सांभाळण्याचे काम आहे. त्यात सुधारणा झाली आहे आणि ती ठीक आहे. प्रश्न येतो, तू कोण आहेस? याबाबत तू तीन महिन्यांची तुतारी सांगीतली. तुमची भाजपशी लढाई नाही. तुम्ही हिंदू, मुस्लिम असे काही करत नाही. तुमची तक्रार फक्त रणजितसिंग नाईक निंबाळकर बाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत माजवत आहेत. किंवा दहशतवाद्यांचे समर्थन करू नका, ही तुमची तक्रार आहे. ते आम्ही सांगून बघू. फरक करायला हरकत नाही, नाहीतर तुतारी वाजवायला किती वेळ लागेल, असा थेट संकेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
दरम्यान, शरद पवारांशी वेगळे झाल्यानंतर रामराजे निंबाळकर अजित पवार यांच्यासोबत होते. स्थानिक पातळीवर येणारे आश्वासन तुतारीसोबत जाण्याचे संकेत देत आहेत. रामराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत रुग्ण मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अजित पवारांना प्रसिद्धी मिळाली नाही तर रामराजेंना राजीनाम्यामुळे मोठा धक्का बसू शकतो, असे बोलले जात आहे.