पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी चारच्या सुमारास बोपखेल-दिघी मार्गावर घडली.
अमोल सत्यवान हुलावळे (वय ४०, रा. फुगेवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. गोपीचंद सत्यवान हुलावळे (वय ४४, रा. फुगेवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ अमोल हे त्यांच्या दुचाकीवरून बोपखेल – दिघी मार्गे चर्होली येथे जात होते.
ते एआयटी कॉलेज समोर आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यामध्ये अमोल यांच्या डोक्याला, हाताला, छातीला तसेच शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. फौजदार ए. एम. शिंगारे तपास करीत आहेत.