पिंपरी: रहाटणी पिपंळे सौदागर मधील ९ मीटर ते ४५ मीटर पर्यत संपुर्ण रस्ते आत्याधुनिक पध्दतीने विकसीत झाले आहेत. परंतु शिवार चौक ते गोविदं गार्डन चौक कुणाल आयकॅान रस्ता हा परिसरातील मुख्य रस्ता मागील अनेक दिवसापासून विकसित होण्यासाठी प्रलंबित आहे.
या रस्त्या लगत मोठ्या रहिवाशी सोसायट्या, व्यवसायीक दुकाने, रूगणालय, बॅक, हॅाटेल, शाळा आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमी वाहतुक कोडींला सामोरे जावे लागत होते. हा रस्ता लवकरात लवकर विकसीत व्हावा यासाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी वेळोवेळी मा. आयुक्त तथा मनपाचा संबधीत स्थापत्य प्रकल्प विभाग व इतर विभागाशी प्रत्यक्ष भेटुन व पत्र व्यवहार केला.
यावर मनपा स्थापत्य प्रकल्प विभागाचे अधिकारी व सल्लागार कंपनी यांच्यासोबत या रस्त्याची पाहणी नाना काटे यांच्या समवेत केली होती. शिवार चौक ते गोविंद गार्डन पर्यत चा १८ मीटर व १२ मीटर रस्ता विकसीत करताना, नागरिकाचा सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्याधुनिक पध्दतीने विकसीत व्हावा, अशा सुचना केल्या होत्या. ज्यामधे प्रशस्त रस्ता, फुटपाथ, सायकल ट्रॅक, मोठ्या क्षमतेची स्ट्रॅाम वॅाटर लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन, विद्युत केबल, पथदिवे, दिशा दर्शक फलक व इतर आधुनिक गोष्टीचा वापर होवुन हा रस्ता विकसीत करण्यात यावा अशा सुचना काटे यांनी केल्या होत्या.
महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये हा रस्ता अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेटं नुसार आत्याधुनिक पध्दतीने विकसीत करण्यासाठी ५५ कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. हा रस्ता आत्याधुनिक पध्दतीने विकसीत केल्याने रहाटणी पिपंळे सौदागरचा विकासत आणखी भर पडणार असुन कुणाल आयकॅान रस्त्यावरील वाहतुकीच्या त्रासातुन व नागरिकांची सुटका होणार आहे.




