चिंचवड : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, भोसरी मतदारसंघातून पुन्हा महेश लांडगे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने यादीत स्थानिक नेत्यांना प्राधान्य दिले असून, निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाची रणनीती स्पष्ट केली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकांत भाजप मजबूत ताकदीने उतरल्याने प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभा राहणार आहे.
या संदर्भात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले आहेत. आगामी निवडणुकांत भाजपच्या विजयासाठी सर्व स्तरांतून यशस्वी प्रचार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.