पुणे : खेड शिवापुर टोलनाक्यावर पाच कोटी रुपये सापडल्यावर महाराष्ट्रातील विरोधकांनी आरोप केला आहे की ही रक्कम शहाजी बापू पाटील यांना देण्यासाठी आली होती. या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे आणि यासाठी आवश्यक ती चौकशी करण्यात येईल. विरोधकांनी केलेले आरोप गंभीर असून, याची सत्यता समजून घेण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट इशारा दिला आहे.
यामुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाची पुढील दिशा काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे विरोधकांच्याकडून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामध्ये पैशाचे खूप मोठे ढिग दिसत आहेत. एकूण पाच गाड्या होत्या मात्र एकच गाडी सापडली असाही आरोप विरोधकांच्याकडन होत आहे.