पुणे : अजित पवार यांनी पुढाकार घेऊन तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यात समेट घडवून आणला आहे. पवारांच्या या खेळीमुळे दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला गेली आहे. अजित पवारांनी ही जागा निवडून आणण्याचा चंग बांधला असून, ते भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना ते निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत.



