पिंपरी : लोकसभा निवडणुकीत नगर असणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत लोकसभा निवडणुकीत मोलाची साथ देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला एकही जागा न दिल्याने काहीसा नाराजीचा सूर पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घटक दिसून येत आहे. आज जाही केलेल्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीमध्ये वसीने मधून अजित गव्हाणे व चिंचवड मधून राहुल कलाटे यांचे नाव जाहीर करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तत्पूर्वी शनिवारी जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. आता, तिसऱ्या यादीतून या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान, माण खटाव विधानसभा मतदारसंघासाठी यांंचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांचे नावं घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून उत्तम जानकर विरोधात कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, माढ्यातून आणि करमाळ्यातूनही महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.




