मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 5 ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 96 जणांना एबी फॉर्म वाटप
शिवसेना ठाकरे गटाकडून 96 उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण 96 एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडी जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला असा आहे
शिवसेना UBT = 96
काँग्रेस = 102
राष्ट्रवादी SP = 87