मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी ६ वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर होतील. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो.
चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल समोर आला आहे. महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील असं हा पोल सांगतो आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील असं हा पोल सांगतो आहे. तर इतर सहा ते आठ जागा इतर आणि अपक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.
पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो आहे?
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल. १२२ ते १८६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १२१ जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.
महायुतीला १४५ ते १५५ जागा काय सांगतोय न्यूज एक्सचा पोल?
महायुतीला १४५ ते १५५ जागा मिळतील असा अंदाज न्यूज एक्सच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.
एकूणच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि सत्तेत असणाऱ्या महायुतीने घसरलेला टक्का सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी मराठवाडा मध्ये जरांगे फॅक्टर फायद्याचा ठरताना दिसत आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला कमीत कमी आमदार सोबत असतानाही ४० पेक्षा अधिक आमदार मिळताना दिसत आहेत. पक्षफुटीच्या सहानुभूतीचा फायदा होताना दिसत आहे.



