नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना जोरदार टोला लगावलाय. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी मविआच्या मित्रपक्षांना टोला लगावला आहे.
दरम्यान अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून ही प्रत्युत्तर देण्यात आले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्यावरुन प्रत्युत्तर देत अमोल कोल्हेंना सल्ला दिला आहे.
आम्हाला सल्ला कमी द्यावा – विजय वडेट्टीवार
एका वृत्तपत्राचा अग्रलेख वाचला तर सगळं लक्षात येईल की, 9 कोटींवर मतदान वाढले आहे. झोल झालं करून हे सरकार आले आहे. EVM च्या भरवशावर हे सरकार सत्तेत आले आहे. पाश्वी बहुमत संदर्भात चर्चा करत आहे. किंबहूना अमोल कोल्हेंना एवढंच सांगतो त्यांनी स्वत:च पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.


