पुणे : ओरीस कॉइन ह्या क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी उघडकिस आणला आहे.
या प्रकरणात आरोपी अविनाश अवदेश सिंग आणि रविशंकर रामकुमार ठाकूर यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर ओरिस कॉइन कंपनीचे मालक राहुल खुराना व तरुण त्रिका हे दोन मुख्य आरोपी अद्याप मात्र फरार आहेत. या चार ही आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरातील आणि राज्यातील अनेक गुंतवणूकदाराची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केली असल्याच पोलीस तपासात उघडकीस आला आहे.




