मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान नाही
पूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांच्यावर कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद अद्याप सोडलेले नाही.
जबाबदारी मिळाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया
पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो. सर्वांनी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. माझा हा सन्मान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष आहे. जबाबदारीच ओझं खांद्यावर आल्यावर दडपण येत, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.



