![]()
मुंबई: वित्तीय गुंतवणूक सल्ला सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीच्या चार संचालकांसह इतर व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी दोघांना अटक केली. मुंबईसह ठाणे, कल्याणमधील जवळपास सव्वा लाख ग्राहकांना हजारो कोटी रुपयांना लुबाडणाऱ्या ‘टोरेस’नंतर १०० कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे.
मुलुंड पोलीस ठाण्यात मंगळवारी ‘मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू आणि इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेणुगोपाल आणि रावराणे यांना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कांदिवली येथील व्यावसायिकाने ऑक्टोबर २०२४मध्ये ‘मनीएज’विरोधात तक्रार केली होती.
फसवणूक करण्याची पद्धत
संचालकांनी २०१३मध्ये ‘मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज’ स्थापन केली. त्याअंतर्गत ‘मनीएज इन्व्हेस्टमेंट’, ‘मनीएज फायनकॉर्प’, ‘मनीएज रिअल्टर्स’, ‘मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस’ या कंपन्या स्थापन करण्यात आल्या. त्यासाठी ‘मुद्रा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ आणि ‘जीवन मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ यांची मदत घेण्यात आली. गुंतवणूकदारांना २४ टक्के दराने वार्षिक परतावा देण्याचे आमिष दाखवले जात होते. मात्र, मे २०१४नंतर व्याजानुसार पैसे मिळणे झाले.



