सैफ अली खानच्या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर आरोपीचा चेहरा दिसला होता. त्याच्याशी साध्यर्म असणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून तोच आरोपी आहे का? याची चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी याआधी सांगितले होते की, सैफच्या पाठीतून काढलेल्या ब्लेडचा एक भाग ताब्यात घेतला आहे. तर उर्वरित भाग परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला शेवटचे वांद्रे स्थानकात पाहिले गेले होते. या घटनेनंतर आरोपी वांद्रे स्थानकात गेला आणि तिथून सकाळच्या पहिल्या ट्रेनने तो वसई-विरारच्या दिशेने गेला, असा पोलिसांचा अंदाज असून त्यादृष्टीने पोलिसांनी शोध सुरू केला. वसई, नालासोपारा आणि विरार भागात मुंबई पोलिसांची पथके रवाना झाली होती.