मुंबई : जिल्हा नियोजन समित्यांवर नेमण्यात आलेले नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रितांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.
जिल्हा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या नियुक्त्या नामनिर्देशित किंवा विशेष निमंत्रित म्हणून केल्या जातात. राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले असून, नव्याने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार नव्याने नियुक्त्या करण्यासाठी आधीच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.




