अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी मानाचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. हे एक मोठे यश आहे आणि महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात या स्पर्धेचे महत्त्व खूप आहे.
अहिल्यानगरमध्ये आज (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत बाजी मारत ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली आहे.

पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली आहे. पृथ्वीराज मोहळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.
६७ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा
६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहील्यानगर येथे २९ जानेवारी पासुन सुरु झाल्या आहेत. ३१ जानेवारी रोजी ६५ , ७४ व ९२ कीलो गादी माती विभागाचा अंतिम फेरी झाली असुन त्याचा निकाल खालील प्रमाणे ….
*६५ कीलो गादी विभाग*
प्रथम – पै. ज्योतिबा अटकळे – सोलापूर
व्दितीय – पै. मनिष बनगर – मुंबई उपनगर
तृतीय – पै.आकाश नागरे – बीड
तृतीय – पै.कीरण सत्रे – सोलापूर
*६५ कीलो माती विभाग*
प्रथम – पै.सद्दाम शेख – कोल्हापूर
व्दितीय – पै.अनिकेत मगर – सोलापूर
तृतीय – शनिराज निंबाळकर – सोलापूर शहर
*७४ कीलो गादी विभाग*
प्रथम – पै.आदर्श पाटील- कोल्हापूर शहर
व्दितीय -पै. दयांनद पाटील – सोलापूर
तृतीय -पै.योगेश्वर तापकीर – पिं.चिंचवड
तृतीय – पै.धैर्यशील लोंढे – कोल्हापूर
*७४ कीलो माती विभाग*
प्रथम – पै.अक्षय चव्हाण – पुणे
व्दितीय – पै. निलेश हिरगुडे – कोल्हापूर
तृतीय – पै.सौरभ शिंदे – अहील्यानगर
*९२ कीलो गादी विभाग*
प्रथम – पै.श्रेअस गाट – कोल्हापूर
व्दितीय -पै. अभिजित भोईर – पुणे
तृतीय -पै. मोईन मुलानी – सोलापूर
तृतीय – पै.ऋषीकेश पाटील- कोल्हापूर
महाराष्ट्र केसरी गादी विभागात होणरी अंतिम लढत
पै.शिवराज राक्षे × पै.पृथ्वीराज मोहोळ
महाराष्ट्र केसरी माती विभाग होणारी अंतिम लढत
पै.महेंद्र गायकवाड × पै.साकेत यादव
अंतिम विजेता : पै.पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी




