पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, “माझी वसुंधरा 5.0” आणि “स्वच्छ सर्वेक्षण 2024” अभियानांच्या अंतर्गत, वॉर्ड 28 पिंपळे सौदागर येथील GVP पॉईंटचे संपूर्ण रूपांतर करण्यात यशस्वी ठरली आहे. पूर्वी ज्या ठिकाणी कचऱ्याचा खच होता, त्याला स्वच्छ करून नवीन दृष्य दिले आहे. “वेस्ट टू आर्ट” या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा अवलंब करून, कचऱ्याचा योग्य पुनर्वापर करणे आणि तो कला रूपांतरणात बदलणे ही संकल्पना पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने राबवली आहे.
GVP पॉईंट या ठिकाणी कचऱ्याचे संकलन करतानाच त्याला रंगीबेरंगी कलात्मक रूप दिले गेले. कचऱ्याचे पुनर्वापर करून बनवलेले कलात्मक फलक, चित्रकला आणि सजावटीचे साहित्य यांनी परिसरात एक नवीन दृष्य निर्माण केले. या उपक्रमामुळे परिसराचा सौंदर्यवर्धन झाला असून, कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी एक आदर्श तयार करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, शहरातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, पुनर्वापराचे महत्त्व समजावणे, आणि लोकांना स्वच्छता आणि पर्यावरणीय शुद्धतेचे महत्त्व सांगणे. “वेस्ट टू आर्ट” संकल्पनेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे आणि त्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
“माझी वसुंधरा 5.0” आणि “स्वच्छ सर्वेक्षण 2024” अंतर्गत या उपक्रमाचा राबवठा अधिक प्रभावी बनवण्यासाठी महानगरपालिकेने पुढील काळात याच संकल्पनेला इतर ठिकाणी विस्तारित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तथापि, या उपक्रमाच्या यशस्वितेला पाहता पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची दिशा योग्य आणि सकारात्मक असून, हे एक आदर्श ठरू शकते.



